Posts

Image
मिसळ पाव दिवाळीची खरेदी करता करता खूप भूक लागली आहे याची जाणीव झाली (कदाचित पैसे संपत आले होते म्हणून भूकेची जाणीव झाली असावी,. असो). जवळपास नजर टाकली आणि जवळच्या फास्ठफूड मध्ये गेलो (पुण्यात आल्यापासून चपाती आणि भाजी कमी आणि चटर फटर खायची सवय लागली...). मस्तपैकी “मिसळ पाव” खाल्ला आणि कॉफी घेत होतो. कॉफीचा घोट घेता घेता माझी नजर गेली ती पलीकडच्या टेबलवर बसलेल्या वयस्कर म्हाताऱ्या बाबांवर. वय अंदाचे ६०-६२ असावे, कपडे जुने आणि मळकटलेले, कुठेतरी काळा केस, लांब नाक, वाढलेली दाढी आणि सुरकुत्या पडलेले हात असा काही त्यांचा वेश होता. थकलेल्या आवाजात बाबा (वेटरला): “ये बाळा, २ वडा दे र, पण पाव नग, माझ्याकडे भाकरी हाय” बाबाने पांढऱ्या फडक्यातून २ भाकरी काढली आणि वडा- भाकरी खाऊ लागला. त्यावेळी मला वाटल, पैसे द्यावे...वाटलं याच कदाचित कुणी नसावं...., किंवा दुसरा विचार आला कि कुणी न कुणी तरी असेल की. मग ही वेळ का? त्याची भाकरी संपणार तोवर वेटर आला आणि म्हणाला : “बाबा, मिसळ पाव खाणार का?, पैसे मागणार नाही” बाबा (फडक्याने तोंड पुसत): “बाळा, आज देशील र आन ते म्या खाईन बी, ... प